मनात भलते सलते विचार येत असतील तर एकदा जरूर वाचा
मनात जर आत्महत्येसारखे विचार येत असतील तर समजावं कि मनाचा तुच्छ दुबळेपणा च्या भावना बुद्धी वर हावी आहे अशा स्थितीत बरे वाईट काय हे समजण्याची कुवत नसते बुद्धी हि मनाच्या ताब्यात आहे आणि मन तिला पंगू बनवून नाचवतोय.
मन हे निराशेवर, फ्रस्ट्रेशन वर अशा प्रकारे तुटून पडत जसे कीटक आगीवर.
अशा स्थितीत आऊट ऑफ द बॉक्स जाऊन भावना एका बाजूला ठेवून तर्क संगत न्यायसंगत विचार करावा, स्वतः च आपल्यात सकारात्मकता येईल.
जीवन हा एक सिनेमा आत्मा याचा डायरेक्टर मन हे या पिक्चर चा हिरो तर बुद्धी या पिक्चर चे हिरोईन असते साधारण मनुष्य हा प्रेक्षक स्वरूपाने हा सिनेमा बघत असतो प्रेक्षकाला फक्त सिनेमा वरची हीरो हीरोइन दिसतात पण डायरेक्टर हा कधीच दिसत नाही तसेच आपल्या आयुष्यात आपल्याला आत्म्याचा अनुभव कदाचितच होत असेल कारण साधारण मनुष्याची चेतना ही कधी आत्म्याच्या स्तरावर येतच नाही साधारण मनुष्याचे चेतना ही त्याच्या मन आणि बुद्धीचा अडकून राहते ज्याप्रकारे प्रेक्षक हा फक्त हिरो आणि हिरोइन लाच बघतो त्याच प्रकारे त्याच प्रकारे संपूर्ण जीवनात बुद्धी आणि आत्मा याच्या पलीकडे आपण जातच नाही जो जीव यांच्या पलीकडे जाऊन आत्म्याला शोधतो तो कधीच परत येत नाही या पिक्चर चा हिरो हा फार चंचल असतो म्हणजेच मन हे फार चंचल असते ती सैरावैरा पळत राहते जर बुद्धी रूप पत्नी द्वारे किंवा हिरोईन द्वारे त्याला योग्य मार्ग दाखवला गेला नाही तर या जीवनरूपी सिनेमा मध्ये त्याची हार निश्चित. म्हणून पत्नी रुपी बुद्धी ही नेहमी सद्बुद्धी च्या स्वरूपात असली पाहिजे अन्यथा जर असे नसेल तर ती पत्नीच या पिक्चर ची सर्वात मोठी विलन होऊन बसते.
बर जीवन काय इतकं स्वस्त आहे कि एका जॉब साठी कमजोर आर्थिक स्थिती साठी ,कि कुना व्यक्ती साठी इत्यादी अनेक सांसारिक समस्यांसाठी त्याचा त्याग करून द्यावा ? मी कॉलेज मध्ये असताना कधी माझी पण मानसिक अवस्था अशी होती.
एक दिवस बस मध्ये चढत असताना मी पाहिलं एक
दोन्ही पाय नसलेला हात पण अपंग असलेला एक व्यक्ती फरफटत येऊन बस मध्ये चढू पाहत होता त्याचा सोबत असलेल्या एका व्यक्ती ने त्याला आधार दिला. सर्वांच्या नजर त्यावर होत्या , कसाबसा तो बस मध्ये चढला आणि हसत मुखाने सीट वर बसला ती. स्थिती पाहून मनात काजवा चमकून गेला कि जर हा व्यक्ती जगू शकतो जीवनाचे आव्हाने स्वीकारू शकतो तर मला काय झालय? मी रात्रभर त्या व्यक्ती चा विचार केला कि हा कस आपलं जीवन जगत असेल छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्यासारखे व्यक्ती सहज साध्य करतात ते त्याला किती आव्हानात्मक वाटत असेल. त्या क्षण पासून सर्व काही बदललं .विचार सकारात्मक झाले . आपल्यापेक्षा कमजोर स्थितीत समजात जे घटक आहेत त्यांचा विचार आपण करावा बघावं त्यांचे कडे त्याच्या पेक्षा तर आपण किती तरी चांगल्या अवस्थेत अहो .
जीवन साइन वेव्ह सारखं सतत पॉसिटीव्ह नेगेटिव्ह हाल्फ सायकल घेत वरच्या दिशेला प्रवास करत असत आयुषयातील साइन वेव्ह चा नीचांक आणि उच्चांक फार काळ राहत नाही आज जर तुम्ही नीचांक च्या वेळी सोडून जाल तर आयुष्यात येणारे शिखर पाहू शकणार नाही
पण आपल्याला दोन्ही अवस्थेत खूप आनंदी आणि दुखत बुडून जाऊ नये आपल्याला नेहमी या वेव्ह चा अक्सिस पकडून वाटचाल करायची असते. कारण दुःख हे येणाऱ्या सुखा चा मार्ग प्रशस्त करते आणि सुख हे दुःखाचा म्हणून जो ऍक्सिस वर राहतो तोच जीवनाचा संपूर्ण आनंद घेऊ शकतो.
हा ऍक्सिस म्हणजे आयुष्यात नेमकं काय?
तर हाच तो अक्सिक्स आहे जो गीताकाराने अर्जुनाला समारंगणात समत्व बुद्धी योग् या नावाने सांगितलं आहे. हाच तो अक्सिक्स आहे जो वेदांनी , शास्त्रांनी उपनिषदांनी सांगितलं आहे
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सुखात आणि दुःखात मनस्थिती विचलित होऊ न देता जीवन जगणे .
जीवनात अनंत संभावना आहेत जीवनाचा आनंद घेण्यासाठी खूप पैसे असावा हे अगदी चुकीचे आहे. एक प्रसिद्ध वाक्य आहे मनस्थिती बदलली कि परिस्थिती बदलते पूर्ण सार्थक वाक्य आहे हे.
जीवन सुरम्य संगीतमय उत्साही आणि अनंत सभावनांनी युक्त आहे या सर्व गोष्टी प्राप्त करण्या साठी मनाची दिशा फक्त बदलावी लागेल. बघा मग परिस्थिती कशी बदलते .
Comments